विठ्ठल सोयरा सज्जन संगती ।

विठ्ठल सोयरा सज्जन संगती ।

               तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भक्तीत एवढे बुडाले कि त्यांना विठ्ठलाशिवाय दुसरे काही सुचत नाही. विठ्ठलाचे नामस्मरण घेणे, भजन-कीर्तन करणे एवढेच त्यांना माहित आहे. त्यांनी आपल्या अंतःकरणात विठ्ठलाला निरंतर स्थान दिले आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणाने, भजन-कीर्तनाने सतत विठ्ठल तुकाराम महाराजांच्या बरोबर असतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, विठ्ठल हा माझा आवडता असून त्या सज्जनाचीच मला संगती आहे. विठ्ठलाच्या भक्तीमुळे तुकाराम महाराजांचे जीवन सुखकर झाले आहे. संसारबंधन, मोह, माया, मत्सर, क्रोध या गोष्टी मनातून काढून त्यांनी आपल्या हृदयात विठ्ठलाला स्थान दिले आहे. त्यामुळे त्यांचे मन पवित्र, निर्मळ, शुद्ध, मऊ झाले आहे. तुकाराम महाराजांच्या मनातच विठ्ठल असल्यामुळे, "विठ्ठल माझ्या चित्तात(मनात) वास करीत आहे." असे ते म्हणतात. 
               "विठ्ठलाने माझे सर्व अंग व माझी काया व्यापून टाकिली, माझी छायाही मला विठ्ठलच भासू लागली."
                तुकाराम महाराज विठ्ठलभक्तीत एवढे गुंतून जाऊ लागले कि त्यांना विठ्ठलाशिवाय दुसरे काही सुचेनासे झाले. त्यांना जळी-स्थळी, आकाशी-पाताळी विठ्ठलाचे रूप दिसू लागले. त्यांच्याबरोबर विठ्ठलच आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांची सावलीही त्यांना विठ्ठलासारखी भासू लागली. तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवनच विठ्ठलभक्तीने व्यापून गेले. त्यांना प्रत्येक घासागणिक विठ्ठल दिसू लागला. स्वप्नातसुद्धा ते विठ्ठलाला पहात होते. एवढे ते विठ्ठलाशी एकरूप झाले होते. त्यांचे हृदयातच विठ्ठलाने वास केला होता. ते तनाने (शरीराने ) व मनानेही विठ्ठलरूप झाले होते. म्हणूनच ते म्हणतात कि, "विठ्ठलाने माझे सर्व अंग व काया व्यापून टाकिली. माझी छायाही मला विठ्ठलच भासू लागली."
          "माझ्या जिव्हेवर विट्ठलाचेच चिंतन आहे. म्हणून मी विठ्ठलावाचून दुसरे काही एक बोलत नाही."
               तुकाराम महाराज सतत विठ्ठलाच्या भक्तीतच गढून गेलेले असतात. सतत मुखात विट्ठलाचेच नामस्मरण चालू असते. भजन-कीर्तनही विट्ठलाचेच गात असतात. त्यांच्या प्रत्येक शब्दागणिक विठ्ठल बोलत असतो. त्यांच्या जिभेवरच (जिव्हेवर) विठ्ठलाचे स्थान आहे. त्यांना विठ्ठलाशिवाय दुसरे काही बोलता येत नाही. म्हणूनच ते म्हणतात कि, "माझ्या जिव्हेवर (जिभेवर) विट्ठलाचेच चिंतन आहे. म्हणून मी विठ्ठलावाचून दुसरे काही बोलत नाही." 
               "सगळ्या इंद्रियांमध्ये मन हे श्रेष्ठ आहे आणि तेच विठोबाचे ध्यान करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता ह्या विठ्ठलाला मला विसंबता येत नाही." 
               तुकाराम महाराजांच्या मते मन हे सर्व इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे कारण मनात सतत विट्ठलाचेच चिंतन चालू असते त्यामुळे मनातील वाईट विचार, प्रवृत्ती जाऊन मन पवित्र, निर्मळ होते. मनात सतत विठ्ठलभक्तीची ओढ लागते. विठ्ठलाशिवाय दुसरे काही मनात येत नाही. जसे मनात विचार येतात तशी माणसाची प्रवृत्ती असते. मनात वाईट विचार आले तर माणसाच्या हातून वाईट कृत्य घडते. मनात चांगले विचार असले तर माणसाच्या हातून चांगली कृत्य घडतात. तुकाराम महाराजांच्या  मनात नेहमी विट्ठलाचेच ध्यान चालू असते. (चिंतन चालू असते). म्हणूनच त्यांच्यातील मोह, माया, मत्सर, क्रोध, वासना इ. वाईट गोष्टींचा त्यांचे मन पवित्र, निर्मळ झाले आहे. आता त्यांना विठोबाशिवाय दुसरे काही सुचत नाही. त्यांच्या मनात सतत विट्ठलाचेच चिंतन चालू असते. म्हणूनच ते म्हणतात कि, "मला विठ्ठलाला विसंबता येत नाही" 
               















Comments

Popular posts from this blog

आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।।

विठो माझा लेकुरवाळा

पांडुरंगाच्या भूपाळ्या