Posts

Showing posts from August, 2018

विठ्ठल सोयरा सज्जन संगती ।

Image
विठ्ठल सोयरा सज्जन संगती ।                तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भक्तीत एवढे बुडाले कि त्यांना विठ्ठलाशिवाय दुसरे काही सुचत नाही. विठ्ठलाचे नामस्मरण घेणे, भजन-कीर्तन करणे एवढेच त्यांना माहित आहे. त्यांनी आपल्या अंतःकरणात विठ्ठलाला निरंतर स्थान दिले आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणाने, भजन-कीर्तनाने सतत विठ्ठल तुकाराम महाराजांच्या बरोबर असतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, विठ्ठल हा माझा आवडता असून त्या सज्जनाचीच मला संगती आहे. विठ्ठलाच्या भक्तीमुळे तुकाराम महाराजांचे जीवन सुखकर झाले आहे. संसारबंधन, मोह, माया, मत्सर, क्रोध या गोष्टी मनातून काढून त्यांनी आपल्या हृदयात विठ्ठलाला स्थान दिले आहे. त्यामुळे त्यांचे मन पवित्र, निर्मळ, शुद्ध, मऊ झाले आहे. तुकाराम महाराजांच्या मनातच विठ्ठल असल्यामुळे, "विठ्ठल माझ्या चित्तात(मनात) वास करीत आहे." असे ते म्हणतात.                 "विठ्ठलाने माझे सर्व अंग व माझी काया व्यापून टाकिली, माझी छायाही मला विठ्ठलच भासू लागली."                 तुकाराम महाराज विठ्ठलभक्तीत एवढे गुंतून जाऊ लागले कि त्यांना विठ्ठलाशिवाय दुसरे काही स

विठो माझा लेकुरवाळा

Image
                विठो माझा लेकुरवाळा । विठो माझा लेकुरवाळा ।  संगे लेकुरांचा मेळा ।। १ ।। निवृत्ती हा खांद्यावरी ।  सोपानाचा हात धरी ।। २ ।। पुढे चाले ज्ञानेश्वर ।  मागे मुक्ताई सुंदर ।। ३ ।। गोरा कुंभार मांडीवरी ।  चोखा जीवा बरोबरी ।। ४ ।। बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी ।। ५ ।। जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ।। ६ ।।                 जनाबाईने या अभंगातून लेकुरवाळ्या विठ्ठलाचे दर्शन केले आहे. निवृत्ती, सोपान, ज्ञानेश्वर, मुक्ताई, गोरा कुंभार, चोखा, बंका, नामदेव, जनाबाई हि सर्व संत मंडळी विठ्ठलाची लेकरे होती. विठ्ठल ह्या लेकरांचा आई-बाप झाला होता. आपल्या लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होता. आई-बाप जसे आपल्या लेकरांची काळजी घेतात त्याप्रमाणे विठ्ठल आपल्या लेकरांची काळजी घेत होता. त्यांच्या संकटाच्या वेळी, अडीअडचणीत धावून जात होता. त्यांच्या हाकेला ओ देत होता. म्हणूनच पुंडलिकाने भिरकावलेल्या विटेवर विठ्ठल युगानुयुगे विटेवर उभा आहे. जनीबरोबर दळण दळत होता. गोरोबाचा चिखल तुडवत होता. दामाजीसाठी महार झाला. नामदेवाच्या हातून जेवण जेवला. एकनाथांच्या घरी पाणी

विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती ।

Image
विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती ।                     तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या जवळ जायचे असेल, त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल तर काय केले पाहिजे हे सांगितले आहे. विठ्ठलाची वरवरची भक्ती करून उपयोगाचे नाही तर अंत:करणापासून भक्ती केली पाहिजे. विठ्ठलाची भक्ती करताना अंत:करण पवित्र, निर्मळ असले पाहिजे. काम, क्रोध, मत्सर, अहंकार, लोभ या वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे. मुखात विठ्ठलाचे नाम (नाव) असले पाहिजे. असे केले तरच आपल्याला विठ्ठल भेटणार आहे.                      तुकाराम महाराजांच्या मते ज्या लोकांच्या गाण्यात विठ्ठल आहे म्हणजेच जे लोक विठ्ठलाचे गुणगान गातात, भजन कीर्तन करतात तसेच त्यांच्या चित्तात विठ्ठल असून त्यांचे विश्रांतीस्थान विठ्ठल आहे असे लोक विठ्ठलाशी एकरूप झाले आहेत. अशा लोकांना ठायीठायी विठ्ठल दिसत आहे. जळी-स्थळी, आकाशी-पाताळी विठ्ठलाचे सावळे सुंदर रूप दिसत आहे. अगदी आसनावर बसले तरी विठ्ठल; अंथरुणावर निजल्या-निजल्या विठ्ठल दिसत आहे. जेवताना प्रत्येक घासागणिक विठ्ठल दिसत आहे. हे लोक विठ्ठलाचे पायी एवढे वेडे झालेत कि, त्यांना जागेपणी तसेच स्वप्नांतही विठ्ठल दिसत आहे.

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल |

Image
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल ।            'विठ्ठल बोलावा व विठ्ठल पाहावा आणि विठ्ठलच जिवाभावाने प्रिय करावा.  ह्या सोसानेच मन हवभरी झाले आहे. ते तेथून संसाराकडे परत होत नाही.'                तुकाराम महाराजांना संसारात अनेक यातना भोगाव्या लागल्या. कष्ट सोसावे लागले. त्यांच्या वाण्याच्या व्यवसायात खोट बसून धंदा बुडाला. दुष्काळाने त्यांच्या जवळील पैसे धान्य संपले. अन्नान्न करून बायको गेली. अशा त्यांच्यावर एकामागून एक आपत्ती कोसळल्यामुळे त्यांचे संसारातील मन उडाले.  भंडारा डोंगरावर जाऊन एकांतात बसू लागले. विठ्ठलनामात दंग होऊ लागले. जेथे जातील तेथे विठ्ठलाचे   नामस्मरण करू लागले. भजन कीर्तन करू लागले. असे ते विठ्ठलाशी एकरूप होऊ लागले. त्यांना   जिकडे तिकडे विठ्ठलच दिसू लागला. त्यांच्या अंतःकरणात पूर्णपणे विठ्ठल  विसावला आहे. तुकाराम महाराजांचे जीवनच विठ्ठलमय झाले आहे. म्हणूनच ते म्हणतात कि ''बोलावा विठ्ठल। पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ।।" म्हणजेच आपले मुखात सतत विठ्ठलाचे नाव असावे. त्याचे सावळे सुंदर रूप डोळ्यांसमोर आणून त्याचे नामस्मरण करावे. विठ्ठला