Posts

Showing posts from December, 2018

आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।।

Image
आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।।  आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।। १ ।। आता दृष्टीपुढे ऐसाचि तूं राहें । जो मी तुज पाहें पांडुरंगा ।। २ ।। अर्थ : हे देवा, तुझे गोजिरे सगुणरूप पाहून माझ्या डोळ्यांस सुख झाले आहे, म्हणून मला हेच रूप आवडते. हे पांडुरंगा, ज्या वेळी मी तुला पाहीन त्यावेळी माझ्या दृष्टीपुढे तू जसा आहेस तसाच कायम रहा. भावार्थ : तुकाराम महाराज पांडुरंगाची भक्ती करू लागले, त्याच्या नामस्मरणात तल्लीन होऊ लागले. विठ्ठलाशी एकरूप होऊ लागले. ते जेथे जातील तेथे विठ्ठल त्यांच्याबरोबर असायचा. त्यांची सावलीही त्यांना विठ्ठलाप्रमाणे भासायची. त्यांना उठता-बसता, जागेपणी, स्वप्नही विठ्ठलाचे सावळे, सुंदर, गोजिरे, कटीवर हात ठेवलेले, कंठी तुळशीमाळा, कंबरेला जरीकाठी पितांबर नेसला आहे. कपाळी कस्तुरी मळवट भरला आहे व मस्तकावर मुकुट व कानात कुंडले धारण केली आहेत. अंगावर भरजरी शेला आहे. शेजारी आई रखुमाबाई उभी आहे. असे सगुण श्रीमुख त्यांना दिसत आहे. त्यांना हे रूप पाहून त्यांचे डोळ्यात आनंद दिसत आहे(डोळ्यास सुख प्राप्त झाले आहे). त्यांना विठ्ठलाचे