विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती ।

विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती ।

                    तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या जवळ जायचे असेल, त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल तर काय केले पाहिजे हे सांगितले आहे. विठ्ठलाची वरवरची भक्ती करून उपयोगाचे नाही तर अंत:करणापासून भक्ती केली पाहिजे. विठ्ठलाची भक्ती करताना अंत:करण पवित्र, निर्मळ असले पाहिजे. काम, क्रोध, मत्सर, अहंकार, लोभ या वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे. मुखात विठ्ठलाचे नाम (नाव) असले पाहिजे. असे केले तरच आपल्याला विठ्ठल भेटणार आहे. 
                    तुकाराम महाराजांच्या मते ज्या लोकांच्या गाण्यात विठ्ठल आहे म्हणजेच जे लोक विठ्ठलाचे गुणगान गातात, भजन कीर्तन करतात तसेच त्यांच्या चित्तात विठ्ठल असून त्यांचे विश्रांतीस्थान विठ्ठल आहे असे लोक विठ्ठलाशी एकरूप झाले आहेत. अशा लोकांना ठायीठायी विठ्ठल दिसत आहे. जळी-स्थळी, आकाशी-पाताळी विठ्ठलाचे सावळे सुंदर रूप दिसत आहे. अगदी आसनावर बसले तरी विठ्ठल; अंथरुणावर निजल्या-निजल्या विठ्ठल दिसत आहे. जेवताना प्रत्येक घासागणिक विठ्ठल दिसत आहे. हे लोक विठ्ठलाचे पायी एवढे वेडे झालेत कि, त्यांना जागेपणी तसेच स्वप्नांतही विठ्ठल दिसत आहे. विठ्ठलापुढे त्यांना दुसरे काही सुचत नाही. विठ्ठलावांचून व त्याच्या भक्तीवाचून दुसरे काही जाणत नाहीत. अशा लोकांना विठ्ठलाच्या पायातच सुख दिसत आहे. विठ्ठलाची भक्ती केल्याने जेवढे त्यांना सुख प्राप्त झाले होते तेवढे कशानेही प्राप्त होत नाही. विठ्ठलाच्या भक्तीशिवाय त्यांना दुसरे कुठलेही सुख दिसत नाही. विठ्ठलाची भक्ती, त्याचे नामस्मरण, भजन-कीर्तन आदी भूषणादी अलंकार प्रिय आहेत व हाच त्यांचा निर्धार आहे. 

Comments

Popular posts from this blog

आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।।

विठो माझा लेकुरवाळा

पांडुरंगाच्या भूपाळ्या