विठ्ठल सोयरा सज्जन संगती ।

विठ्ठल सोयरा सज्जन संगती । तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भक्तीत एवढे बुडाले कि त्यांना विठ्ठलाशिवाय दुसरे काही सुचत नाही. विठ्ठलाचे नामस्मरण घेणे, भजन-कीर्तन करणे एवढेच त्यांना माहित आहे. त्यांनी आपल्या अंतःकरणात विठ्ठलाला निरंतर स्थान दिले आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणाने, भजन-कीर्तनाने सतत विठ्ठल तुकाराम महाराजांच्या बरोबर असतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, विठ्ठल हा माझा आवडता असून त्या सज्जनाचीच मला संगती आहे. विठ्ठलाच्या भक्तीमुळे तुकाराम महाराजांचे जीवन सुखकर झाले आहे. संसारबंधन, मोह, माया, मत्सर, क्रोध या गोष्टी मनातून काढून त्यांनी आपल्या हृदयात विठ्ठलाला स्थान दिले आहे. त्यामुळे त्यांचे मन पवित्र, निर्मळ, शुद्ध, मऊ झाले आहे. तुकाराम महाराजांच्या मनातच विठ्ठल असल्यामुळे, "विठ्ठल माझ्या चित्तात(मनात) वास करीत आहे." असे ते म्हणतात. "विठ्ठलाने माझे सर्व अंग व माझी काया व्यापून टाकिली, माझी छायाही मला विठ्ठलच भासू लागली." ...