विठ्ठल हा चित्ती ।

विठ्ठल हा चित्ती । "श्री विठ्ठलाचे नाव व गाणे चित्तास गोड लागते. आमचे जीवन एक विठ्ठलच असून टाळ व चिपळ्या हेच काय ते आमचे धन आहे." विठ्ठल भक्तीत एवढी जादू आहे कि माणूस स्वतःला हरवून जातो. विठ्ठलाचे नाव जरी घेतले तरी मनाला समाधान वाटते. मन प्रसन्न, आनंदी होते. विठ्ठल आपल्याबरोबर असून आपल्या साऱ्या चिंता तो मिटवत आहे असे वाटते. म्हणूनच निश्चिन्त मनाने घेतलेले त्याचे नाव व त्याचे गाणे (गायलेले भजन-कीर्तन) मनास गोड लागते. मन प्रफुल्लित होते. एकदा विठ्ठल भक्तीत, नामस्मरणात मन रमले कि मनात विठ्ठलाशिवाय दुसरे कुठलेही विचार येत नाहीत. मनात विठ्ठलाचे नाव असले कि मनातील वाईट विचार, वाईट प्रवृत्ती दूर पळून जातात. आपल्या अंत:करणात विठ्ठल आपले स्थान निर्माण करतो. तुकाराम महाराजही आपल्या साऱ्या चिंता, विवंचना विसरून विठ्ठल भक्तीत, नामस्मरणात एवढे रमले कि, ते पूर्णतः विठ्ठलमय झाले. त्यांच्या जीवनात विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कु...