Posts

आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।।

Image
आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।।  आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहतां लोचन सुखावले ।। १ ।। आता दृष्टीपुढे ऐसाचि तूं राहें । जो मी तुज पाहें पांडुरंगा ।। २ ।। अर्थ : हे देवा, तुझे गोजिरे सगुणरूप पाहून माझ्या डोळ्यांस सुख झाले आहे, म्हणून मला हेच रूप आवडते. हे पांडुरंगा, ज्या वेळी मी तुला पाहीन त्यावेळी माझ्या दृष्टीपुढे तू जसा आहेस तसाच कायम रहा. भावार्थ : तुकाराम महाराज पांडुरंगाची भक्ती करू लागले, त्याच्या नामस्मरणात तल्लीन होऊ लागले. विठ्ठलाशी एकरूप होऊ लागले. ते जेथे जातील तेथे विठ्ठल त्यांच्याबरोबर असायचा. त्यांची सावलीही त्यांना विठ्ठलाप्रमाणे भासायची. त्यांना उठता-बसता, जागेपणी, स्वप्नही विठ्ठलाचे सावळे, सुंदर, गोजिरे, कटीवर हात ठेवलेले, कंठी तुळशीमाळा, कंबरेला जरीकाठी पितांबर नेसला आहे. कपाळी कस्तुरी मळवट भरला आहे व मस्तकावर मुकुट व कानात कुंडले धारण केली आहेत. अंगावर भरजरी शेला आहे. शेजारी आई रखुमाबाई उभी आहे. असे सगुण श्रीमुख त्यांना दिसत आहे. त्यांना हे रूप पाहून त्यांचे डोळ्यात आनंद दिसत आहे(डोळ्यास सुख प्राप्त झाले आहे). त्यांना विठ्ठलाचे

विठ्ठल हा चित्ती ।

Image
विठ्ठल हा चित्ती ।           "श्री विठ्ठलाचे नाव व गाणे चित्तास गोड लागते. आमचे जीवन एक विठ्ठलच असून टाळ व चिपळ्या हेच काय ते आमचे धन आहे."                   विठ्ठल भक्तीत एवढी जादू आहे कि माणूस स्वतःला हरवून जातो. विठ्ठलाचे नाव जरी घेतले तरी मनाला समाधान वाटते. मन प्रसन्न, आनंदी होते. विठ्ठल आपल्याबरोबर असून आपल्या साऱ्या चिंता तो मिटवत आहे असे वाटते. म्हणूनच निश्चिन्त मनाने घेतलेले त्याचे नाव व त्याचे गाणे (गायलेले भजन-कीर्तन) मनास गोड लागते. मन प्रफुल्लित होते.                    एकदा विठ्ठल भक्तीत, नामस्मरणात मन रमले कि मनात विठ्ठलाशिवाय दुसरे कुठलेही विचार येत नाहीत. मनात विठ्ठलाचे नाव असले कि मनातील वाईट विचार, वाईट प्रवृत्ती दूर पळून जातात. आपल्या अंत:करणात विठ्ठल आपले स्थान निर्माण करतो. तुकाराम महाराजही आपल्या साऱ्या चिंता, विवंचना विसरून विठ्ठल भक्तीत, नामस्मरणात एवढे रमले कि, ते पूर्णतः विठ्ठलमय झाले. त्यांच्या जीवनात विठ्ठलाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला (सांसारिक गोष्टींना) स्थान नव्हते. हातात टाळ व चिपळ्या घ्यायच्या व एखाद्या मंदिरात भजन-कीर्त

श्री विठ्ठल संजीवनी अमृत

Image
श्री विठ्ठल संजीवनी अमृत            श्री विठ्ठल हे शब्द केवळ संजीवनी अमृतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, "ह्या विठ्ठल रंगानेच मी सर्वांगाने रंगून गेलो."           तुकाराम महाराज जस-जसे विठ्ठल भक्तीत रमू लागले तसे त्यांच्या संसाराच्या साऱ्या चिंता मिटू लागल्या. त्यांना संसारातील पाशातून मुक्ती मिळाली. त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तींमुळे ते दु:खी झाले होते. जीवनातील त्यांचा रसच संपून गेला होता परंतु विठ्ठल भक्तीमुळे, नामस्मरणामुळे त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. मोह,माया, मत्सर, क्रोध या गोष्टींपासून अलिप्त झाले. त्यांनी आपले सारे जीवनच विठ्ठलाला अर्पण केले. ते पूर्णतः विठ्ठलमय झाले. विठ्ठलाशी एकरूप झाले. विठ्ठलमुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. ते संत पदापर्यंत पोचले. विठ्ठलाचे भजन-कीर्तन करणे, त्याचे नामस्मरण करणे, त्याची सतत भक्ती करणे हाच त्यांचा दररोजचा नित्यक्रम चालू झाला व यातूनच त्यांना आनंद मिळू लागला. जगातील इतर क्षणिक सुखांपेक्षा कितीतरी पटींनी त्यांना विठ्ठलनामामुळे सुख प्राप्त झाले. म्हणूनच ते म्हणतात कि श्री विठ्ठल ह्या एका शब्दापुढे सर्व सुखे

पांडुरंगाच्या भूपाळ्या

Image
पांडुरंगाच्या भूपाळ्या  १) उठा पांडुरंगा आता प्रभातसमयो पातला ।     वैष्णवांचा मेळा गरुडपारी दाटला ।। १ ।।      गरुडपारा पासुनी महाद्वारापर्यंत ।     शुकसनकादिक नारद-तुंबर भक्तांच्या कोटी ।     त्रिशूल डमरू घेऊनि उभा गिरिजेचा पती ।। २ ।।     कलीयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी ।     पाठीमागे उभी डोळा लावुनिया जनी ।। ३ ।। २) उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळां ।     झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ।। १ ।।     संत साधू मुनी अवघे झालती गोळा ।     सोडा शेज सुखे आता बघू द्या मुखकमळा ।। २ ।।     रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी ।     मन उतावीळ रूप पहावया दृष्टी ।। ३ ।।     राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया ।     शेजे हालवुनी जागे करा देवराया ।। ४ ।।     गरुड हनुमंत उभे पाहती वाट ।     स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ।। ५ ।।     झाले मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।     विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकडा ।। ६ ।। ३)  उठा उठा साधुसंत साधा आपुले हित । गेला गेला हा नरदेह मग कैसा         भगवंत ।। धृ ।। उठोनि वेगेशी चला जाऊ राऊळांशी । जळती                     पात

विठ्ठल सोयरा सज्जन संगती ।

Image
विठ्ठल सोयरा सज्जन संगती ।                तुकाराम महाराज विठ्ठलाच्या भक्तीत एवढे बुडाले कि त्यांना विठ्ठलाशिवाय दुसरे काही सुचत नाही. विठ्ठलाचे नामस्मरण घेणे, भजन-कीर्तन करणे एवढेच त्यांना माहित आहे. त्यांनी आपल्या अंतःकरणात विठ्ठलाला निरंतर स्थान दिले आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणाने, भजन-कीर्तनाने सतत विठ्ठल तुकाराम महाराजांच्या बरोबर असतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कि, विठ्ठल हा माझा आवडता असून त्या सज्जनाचीच मला संगती आहे. विठ्ठलाच्या भक्तीमुळे तुकाराम महाराजांचे जीवन सुखकर झाले आहे. संसारबंधन, मोह, माया, मत्सर, क्रोध या गोष्टी मनातून काढून त्यांनी आपल्या हृदयात विठ्ठलाला स्थान दिले आहे. त्यामुळे त्यांचे मन पवित्र, निर्मळ, शुद्ध, मऊ झाले आहे. तुकाराम महाराजांच्या मनातच विठ्ठल असल्यामुळे, "विठ्ठल माझ्या चित्तात(मनात) वास करीत आहे." असे ते म्हणतात.                 "विठ्ठलाने माझे सर्व अंग व माझी काया व्यापून टाकिली, माझी छायाही मला विठ्ठलच भासू लागली."                 तुकाराम महाराज विठ्ठलभक्तीत एवढे गुंतून जाऊ लागले कि त्यांना विठ्ठलाशिवाय दुसरे काही स

विठो माझा लेकुरवाळा

Image
                विठो माझा लेकुरवाळा । विठो माझा लेकुरवाळा ।  संगे लेकुरांचा मेळा ।। १ ।। निवृत्ती हा खांद्यावरी ।  सोपानाचा हात धरी ।। २ ।। पुढे चाले ज्ञानेश्वर ।  मागे मुक्ताई सुंदर ।। ३ ।। गोरा कुंभार मांडीवरी ।  चोखा जीवा बरोबरी ।। ४ ।। बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी ।। ५ ।। जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ।। ६ ।।                 जनाबाईने या अभंगातून लेकुरवाळ्या विठ्ठलाचे दर्शन केले आहे. निवृत्ती, सोपान, ज्ञानेश्वर, मुक्ताई, गोरा कुंभार, चोखा, बंका, नामदेव, जनाबाई हि सर्व संत मंडळी विठ्ठलाची लेकरे होती. विठ्ठल ह्या लेकरांचा आई-बाप झाला होता. आपल्या लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत होता. आई-बाप जसे आपल्या लेकरांची काळजी घेतात त्याप्रमाणे विठ्ठल आपल्या लेकरांची काळजी घेत होता. त्यांच्या संकटाच्या वेळी, अडीअडचणीत धावून जात होता. त्यांच्या हाकेला ओ देत होता. म्हणूनच पुंडलिकाने भिरकावलेल्या विटेवर विठ्ठल युगानुयुगे विटेवर उभा आहे. जनीबरोबर दळण दळत होता. गोरोबाचा चिखल तुडवत होता. दामाजीसाठी महार झाला. नामदेवाच्या हातून जेवण जेवला. एकनाथांच्या घरी पाणी

विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती ।

Image
विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती ।                     तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या जवळ जायचे असेल, त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल तर काय केले पाहिजे हे सांगितले आहे. विठ्ठलाची वरवरची भक्ती करून उपयोगाचे नाही तर अंत:करणापासून भक्ती केली पाहिजे. विठ्ठलाची भक्ती करताना अंत:करण पवित्र, निर्मळ असले पाहिजे. काम, क्रोध, मत्सर, अहंकार, लोभ या वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे. मुखात विठ्ठलाचे नाम (नाव) असले पाहिजे. असे केले तरच आपल्याला विठ्ठल भेटणार आहे.                      तुकाराम महाराजांच्या मते ज्या लोकांच्या गाण्यात विठ्ठल आहे म्हणजेच जे लोक विठ्ठलाचे गुणगान गातात, भजन कीर्तन करतात तसेच त्यांच्या चित्तात विठ्ठल असून त्यांचे विश्रांतीस्थान विठ्ठल आहे असे लोक विठ्ठलाशी एकरूप झाले आहेत. अशा लोकांना ठायीठायी विठ्ठल दिसत आहे. जळी-स्थळी, आकाशी-पाताळी विठ्ठलाचे सावळे सुंदर रूप दिसत आहे. अगदी आसनावर बसले तरी विठ्ठल; अंथरुणावर निजल्या-निजल्या विठ्ठल दिसत आहे. जेवताना प्रत्येक घासागणिक विठ्ठल दिसत आहे. हे लोक विठ्ठलाचे पायी एवढे वेडे झालेत कि, त्यांना जागेपणी तसेच स्वप्नांतही विठ्ठल दिसत आहे.